🙏 जपाच्या देवीचा विजय असो !!!  •  नवरात्रौत्सव २०२६ — ११ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर  •  मंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष  •  दररोज सायं. ५.३० वाजता भवानी मातेचा सामूहिक जप  •  जाहिरात व प्रवेशद्वार प्रायोजकत्वासाठी संपर्क साधा 🙏 Victory to Japachi Devi !!!  •  Navratrotsav 2026 — 11 to 21 October  •  The Mandal's Amrut Mahotsav year  •  Collective Jap of Bhavani Mata daily at 5:30 PM  •  Advertising & entrance-gate sponsorships now open
७५ वर्षांची परंपराA 75-year tradition

जपाच्या देवीचा इतिहासThe Story of Japachi Devi

आई भवानी

मंडळाची स्थापना १९५१ साली विभागातील काही जुन्या जाणत्या नागरिकांनी केली. त्यानंतर अनेक वर्षे विभागातील लोक उत्स्फूर्तपणे देवीच्या दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी मोठ्या संख्येने येऊ लागले.

मंडळाच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे वर्ष ठरले १९९२. त्या वर्षी प्लेगच्या जीवघेण्या साथीमुळे देशात आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली. विभागातील श्रद्धाळू भक्तांनी आई भवानीकडे साकडे घातले आणि स्वच्छता अभियान सुरू केले — ज्यात विभागातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. उत्सव काळात दररोज सायंकाळी ५ वाजता मंडपात एकत्र बसून भवानी मातेचा ध्यानरूपी जप सुरू झाला.

या संकटावर मात केल्याचा प्रत्यय लोकांना आला आणि त्याच वर्षी अनेक वृत्तपत्रांनी याची नोंद घेऊन देवीला “जपाची देवी” हे नाव दिले. आज ७५ व्या वर्षी सोशल मीडिया आणि भक्तांच्या माध्यमातून देवी संपूर्ण देशात जपाची देवी म्हणून प्रसिद्ध आहे.

The Mandal was founded in 1951 by a few respected elders of the neighbourhood. In the years that followed, residents came in ever larger numbers for the Devi's darshan and to offer the traditional oti.

The defining year was 1992. A deadly plague outbreak had created a serious health crisis in the country. The devotees of the area prayed to Aai Bhavani and launched a cleanliness drive, which the whole neighbourhood joined. During the Utsav, everyone began gathering in the pandal at 5 PM every evening for a meditative jap (chanting) of Bhavani Mata.

People felt the crisis had been overcome, and that same year several newspapers reported it and named the goddess "Japachi Devi", the Devi of the Jap. Today, in the Mandal's 75th year, she is known by that name across India through devotees and social media.

१९५१मंडळाची स्थापनाMandal founded
१९९२सामूहिक जप व “जपाची देवी” नामकरणDaily jap begins; named “Japachi Devi”
२०२६वर्ष ७६ वे — अमृत महोत्सव76th year — Amrut Mahotsav
१९५१1951स्थापनाEstablished
७६ वे76thवर्षYear of the Utsav
१०–१२ लाख10–12 lakhअपेक्षित भाविकDevotees expected
सायं. ५.३०5:30 PMदररोज सामूहिक जपDaily collective jap
मंडळाकडूनFrom the Mandal

ताज्या घडामोडीLatest Updates

उत्सवUtsav📅 ११ – २१ ऑक्टोबर २०२६11 – 21 Oct 2026

नवरात्रौत्सव २०२६ — अमृत महोत्सवी वर्षNavratrotsav 2026 — the Amrut Mahotsav year

यंदा मंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष असून ११ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सुमारे १० ते १२ लाख भाविक जपाच्या देवीचे दर्शन घेतील अशी अपेक्षा असून विशेष राजकीय अतिथी व सिनेकलाकारही उपस्थित राहतील.

This is the Mandal's Amrut Mahotsav year. Sharadiya Navratri will be celebrated from 11 to 21 October 2026. Around 10–12 lakh devotees are expected for darshan, along with special guests and film artists.

आगमनAagman

जपाच्या देवीचे भव्य आगमनThe grand arrival of Japachi Devi

ढोल-ताशा, पारंपरिक वेशभूषेतील महिला, देवदेवतांचे देखावे आणि हजारो भक्तांच्या जयघोषात आईचे आगमन करीरोडच्या रस्त्यांवर उत्सवाचे वातावरण निर्माण करते.

With dhol-tasha, women in traditional attire, tableaux of deities and thousands of devotees chanting, the Devi's arrival fills the streets of Curry Road with festive energy.

स्पर्धाCompetitions

लोककला, क्रीडा व पाककला स्पर्धाFolk art, sports & cooking competitions

उत्सव काळात मुले, महिला आणि सर्व वयोगटांसाठी लोककला सादरीकरण, क्रीडा स्पर्धा आणि पाककला स्पर्धांचे आयोजन केले जाते.

During the Utsav the Mandal organises folk-art performances, sports events and cooking contests for children, women and residents of all ages.

सामाजिक उपक्रमSocial work

रक्तदान शिबिर व सत्कार सोहळाBlood donation camp & felicitation

१९९२ च्या स्वच्छता अभियानाची सेवाभावी परंपरा पुढे नेत मंडळ उत्सवात रक्तदान शिबिर आयोजित करते आणि रक्तदात्यांचा सत्कार करते.

Carrying forward the spirit of service from the 1992 cleanliness drive, the Mandal holds a blood donation camp during the Utsav and honours every donor.

जाहिरातSponsorship📅 २०२६-२७

जाहिरात प्रस्ताव २०२६-२७Advertising proposal 2026–27

उत्सवाच्या सजावटीसाठी व मुख्य प्रवेशद्वारांसाठी जाहिरात प्रायोजकत्व उपलब्ध आहे. दर व तपशिलासाठी खालील जाहिरात विभाग पहा.

Sponsorship is open for the Utsav decorations and main entrance gates. See the Sponsorship section below for rates and details.

दर पहा →See rates →
१० ते २१ ऑक्टोबर २०२६10 – 21 October 2026

कार्यक्रम पत्रिका २०२६Programme Schedule 2026

करीरोड सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ — कार्यक्रम पत्रिका २०२६ (१० ते २१ ऑक्टोबर)
🔍 पूर्ण आकारात पहा🔍 View full size ⬇ डाउनलोड करा⬇ Download
आपण कुठेही असाWherever you are

ऑनलाईन दर्शन व व्हिडीओOnline Darshan & Videos

जपाची देवी — शीर्षक गीतJapachi Devi — Title Songपहिल्यांदाच — जपाच्या देवीचे गीतA song dedicated to the Devi, a first for the Mandal
व्हिडीओग्राफी स्पर्धा — तृतीय पारितोषिकVideography Competition — 3rd PrizeShivam Sawant Films
उत्सवामागील हातThe people behind the Utsav

जपाची देवी कार्यकारणी २०२६-२७Executive Committee 2026–27

आम्हाला भेटाVisit us

संपर्कContact Us

मंडळ कार्यालय / उत्सव स्थळMandal office / Utsav venue

२२/सी, जमशेठजी ताडीवाला चाळ, महादेव पालव मार्ग, करीरोड (पूर्व), मुंबई - ४०००१२22/C, Jamshetji Tadiwala Chawl, Mahadev Palav Marg, Curry Road (East), Mumbai – 400012

ओटी, देणगी व जाहिरातीसाठीFor oti, donations & sponsorship

कृपया कार्यकारणी सदस्यांशी थेट संपर्क साधा.Please contact a committee member directly.